मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…


फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि १६ ऑगस्ट २०२६):- :फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर फलटण प्रशालेत स्वातंत्र्य दिन उत्साहात , भक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला .


मा सौ वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर चेअरमन शाळा समिती मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले . उपस्थित विद्यार्थी शिक्षक पालक यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली .

यावेळी विद्यार्थ्यांनी संचलन संगीत कवायत ,देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांचे मने जिंकली . विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शालेय वातावरण देशभक्ती च्या भावनेने भारावून गेले .

Screenshot

कार्यक्रमांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला .प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिताराणी कुमार कुचेकर , यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला .
कार्यक्रमाला निमंत्रित सदस्य मा श्रीमती निर्मला रणवरे , माजी नगरसेवक मा श्री किशोरसिंह नाईक निंबाळकर, मुख्याध्यापिका मुधोजी बालक मंदिर मा सौ रजपूत, नवीन प्राथमिक मा सौ गोसावी मुख्याध्यापिका तसेच बहुसंख्येने पालक शिक्षक विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांच्या सहभागाने स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला .
कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले .

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!