फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण. दि ५ ऑक्टोबर २०२६):-
श्री वारणा विद्यालय, वारणानगर (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथे गुरुवारी (दि. १ ऑक्टोबर २०२६) पार पडलेल्या १४ वर्षांखालील मुलांच्या विभागीय स्तर तायक्वांदो स्पर्धेत चि. रुद्र सोमनाथ भोसले याने उत्कृष्ट कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले आहे. रुद्रने या स्पर्धेत रौप्यपदक (सिल्व्हर मेडल) मिळवून आपल्या शाळेच्या व परिसराच्या लौकिकात भर घातली आहे.
विभागीय स्तरावरील या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत रुद्र भोसले याने आपल्या कौशल्याच्या जोरावर सर्व प्रतिस्पर्ध्यांना नमवत अंतिम फेरीत धडक मारली आणि उपविजेतेपदावर आपले नाव कोरले.या खेळाडूला क्रीडा मार्गदर्शक व प्रशिक्षक संजय तात्याबा कारंडे यांनी विशेष परिश्रम घेऊन मार्गदर्शन केले.
रुद्रने मिळवलेल्या या दैदिप्यमान यशाबद्दल आणि उपविजेतेपदाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, फ.ए.सो. क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, तपासणी अधिकारी दिलीप राजगुडा, सुधीर अहिवळे,मुधोजीचे प्राचार्य वसंतराव शेडगे, माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य ए. वाय. ननावरे, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य सोमनाथ माने, पर्यवेक्षक विजय पाटील, सौ. पूजा पाटील, क्रीडा शिक्षक, सर्व शिक्षकवृंद आणि पालकांनी चि. रुद्र भोसले व प्रशिक्षक संजय कारंडे यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील क्रीडा प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

