मालोजीराजे शेती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे विविध क्षेत्रांत उत्तुंग यश

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण, दि २८ ऑगस्ट २०२६):- फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.विद्यालयातील कुमार वैभव घालमे आणि अमृता पौर्णिमा रवींद्र भोसले या दोन्ही विद्यार्थ्यांची सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून निवड झाली आहे. तसेच अनुजा दिलीप वाघ हिची कृषी अधिकारी या पदावर निवड झाली आहे.

Screenshot

विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर हे यश मिळविले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

Screenshot

या यशामुळे मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या योग्य मार्गदर्शनाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. भविष्यातही विद्यालयातील विद्यार्थी विविध क्षेत्रांत अशीच उत्तुंग भरारी घेतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Screenshot

तीनही विद्यार्थ्यांचे फ.ए.सो. अध्यक्ष तथा मा. विधानपरिषद सभापती मा.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,फ. ए.सो चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण)
फ.ए. सो.चे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर.प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम प्रशालेचे प्राचार्य श्री. बाळकृष्ण काळे. उपप्राचार्या सौ.पूनम कदम व सर्व स्टाफ मालोजीराजे शेतीविद्यालय जुनिअर कॉलेज फलटण
यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!