फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण ,दि ४ मे २०२६) :- फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये 23 एप्रिल रोजी इंग्लिश भाषा दिनाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये इंग्लिश भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
महान इंग्लिश लेखक, नाटककार, सुनीत काव्यरचनाकार व कवी विलियम शेक्सपियर तने इंग्लिश भाषा समृद्ध करण्यामध्ये दिलेले योगदान हे अनन्य साधारण आहे . 23 एप्रिल रोजी त्यांचा जन्मदिन संपूर्ण जगामध्ये इंग्लिश भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.

कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती व विलियम शेक्सपियर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन आणि इंग्रजी ग्रंथाचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे प्राचार्य श्री वसंतराव शेडगे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य वसंत शेडगे म्हणाले की इंग्लिश भाषा विषयाचे अनन्य साधारण महत्व आहे व ती गरजेची भाषा म्हणून ओळखली जाते. जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर इंग्लिश भाषेला आत्मसात करणे आवश्यक आहे कारण ती वैश्विक भाषा असून जगाची ओळख आहे. तसेच त्यांनी विलियम शेक्सपियरचे इंग्लिश भाषा समृद्ध करण्यामध्ये दिलेले योगदान आपल्या भाषणात मांडले.

तसेच यावेळी अनेक विद्यार्थीनींनी आपले मनोगत मांडले. यामध्ये इयत्ता पाचवी मधील कु वेदिका ढालपे, कु श्रुती चौधरी ,इयत्ता सातवी मधील कु कृपा रणवरे यांनी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले व आपले विचार मांडले.
यावेळी प्रशालेचे उपप्राचार्य श्री ए वाय ननवरे,ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्री सोमनाथ माने , पर्यवेक्षक श्री रावसाहेब निंबाळकर , श्री राजेंद्र नाळे, सौ पूजा पाटील इंग्लिश भाषा विभागाचे शिक्षक शिवाजीराव बनकर , डी जे पवार ,चंदन कर्वे, सौ गावडे ,सौ इंगळे , सौ बाबर, माध्यमिक इंग्लिश भाषा विभाग प्रमुख (सकाळ विभाग) सौ सोहनी सस्ते, माध्यमिक इंग्रजी भाषा विभाग प्रमुख (दुपार विभाग) सुजित जमदाडे ,उच्च माध्यमिक इंग्रजी भाषा विभाग प्रमुख प्रितम लोढे,इंग्रजी बाह्य परीक्षा विभाग प्रमुख अमोल सपाटे,कु संगीता कदम ,सौ विभा गुजर ,सौ पवार , सचिन धुमाळ, सौ खलाटे,सौ लोंढे, सौ शिंदें , सौ स्नेहल घोलप, सौ मुक्ता शिंदे, कु बेनझीर मेटकरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

इंग्रजी भाषा दिनाचे औचित्य साधून इयत्ता नववी साठी स्टोरी रायटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये
प्रथम क्रमांक कु गायत्री अनिल वेलणकर
द्वितीय क्रमांक कु प्रांजल रघुनाथ जगदाळे
तृतीय क्रमांक कु श्रेया दत्तात्रय मोटे
चतुर्थ क्रमांक कु स्नेहल सतीश जाधव
पाचवा क्रमांक कु तन्वी प्रविण अहिवळे
सहावा क्रमांक कु श्रेया प्रवीण नाळे
यांनी संपादन केला. वरील विजेत्याना इंग्लिश कथा संग्रह व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ विद्या मदने यांनी केले तर प्रास्ताविक श्री सुजित जमदाडे यांनी केले आणि आभार प्रदर्शन सौ गावडे यांनी केले.

