
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २८ ऑगस्ट २०२६):-
फलटण तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेची नूतन कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली. या निवड प्रक्रियेवेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाचे अध्यक्ष अनिल माने, जिल्हा कार्याध्यक्ष तथा निवडणूक निरीक्षक संजय पवार, जिल्हा उपाध्यक्ष संदीप शिंदे, जिल्हा सचिव इम्रान मुल्ला, माण तालुका सचिव दयानंद जगदाळे, आणि सातारा तालुका माजी अध्यक्ष तथा पुणे माध्यमिक पतसंस्थेचे संचालक श्रीरंग सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी फलटण तालुक्यातील शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनिर्वाचित कार्यकारिणीत
अध्यक्षपदी राहुल कृष्णराव बोबडे,कार्याध्यक्षपदी दत्ता प्रकाश भोसले, सचिवपदी हरिभाऊ रामचंद्र मोरे आणि कोषाध्यक्षपदी शंकर बापूराव वाघमारे यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी दत्तात्रय दिनकर भोसले व सेवक उपाध्यक्षपदी मल्हारी सोपान कोळेकर यांची निवड झाली. कार्यकारिणी सदस्य म्हणून विजय भानुदास जगताप, अमित अरविंद कदम, अमर रमेशचंद्र शेंडे व विष्णू नारायण शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सातारा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. संघटनेच्या माध्यमातून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, न्याय्य हक्कांसाठी आणि संघटना अधिक प्रभावी करण्यासाठी हे नेतृत्व उल्लेखनीय कार्य करेल, असा विश्वास व्यक्त करत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.



