तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत मुधोजी हायस्कूलच्या मल्लांचे सुवर्ण यश; तीन मल्लांची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड….

विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करताना मा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्राचार्य वसंत शेडगे व इतर मान्यवर

फलटण टुडे वृत्तसेवा ( बिबी / फलटण दि १७ सप्टेंबर २०३६):-
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा (१४, १७ व १९ वर्षांखालील मुले/मुली) सरस्वती माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, बिबी येथे उत्साहात पार पडल्या. या मॅटवरील स्पर्धेत मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत यश संपादन केले.

Screenshot


स्पर्धेचे उद्घाटन ‘महाराष्ट्र केसरी’ पै. बापूराव लोखंडे आणि अनिल बोबडे यांच्या शुभहस्ते पार पडले. या प्रसंगी बिबी शाळेचे प्राचार्य हिंदुराव लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकासासोबतच क्रीडा क्षेत्राचे महत्त्व विशद केले. या स्पर्धेत फलटण तालुक्यातील १२० ते १३५ खेळाडूंनी भाग घेतला होता.
मुधोजी हायस्कूलच्या यशस्वी कुस्तीपटूंची कामगिरी (१७ वर्षांखालील मुले):

  • राजवीर रमाकांत (बिट्टू) भोसले: ग्रिकोरोमन कुस्ती स्पर्धा (४८ किलो वजनी गट) – प्रथम क्रमांक
  • समर्थ नितीन मदने: ग्रिकोरोमन कुस्ती स्पर्धा (८० किलो वजनी गट) – प्रथम क्रमांक
  • ओम संजय शिर्के: फ्री-स्टाईल कुस्ती स्पर्धा (६५ किलो वजनी गट) – प्रथम क्रमांक
    या तिन्ही मल्लांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत प्रेक्षकांची मने जिंकली असून, त्यांची सातारा येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हे सर्व खेळाडू फलटण येथील शुक्रवार पेठ तालीम संघात सराव करत असून, त्यांना वस्ताद पै राहुल सरक, मुधोजी हायस्कूलचे क्रीडा मार्गदर्शक पै तुषार मोहिते, क्रीडा विभाग सचिव सचिन धुमाळ आणि पै अमोल नाळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच टीम मॅनेजर म्हणून शिवाजी सावंत व श्रीकांत तावरे यांनी काम पाहिले.
    या यशाबद्दल विधान परिषदेचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, क्रीडा समितीचे अध्यक्ष शिवाजीराव घोरपडे, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, प्राचार्य वसंत शेडगे, उपप्राचार्य आण्णासाहेब ननावरे, सोमनाथ माने यांच्यासह शिक्षकवृंद व पदाधिकाऱ्यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!