फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण ,दि २२ सप्टेंबर २०२६): –
कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण येथील मुख्य बाजारात मंगळवार, दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या लिलावात कांद्याचे दर तेजीत राहिल्याचे पाहायला मिळाले. या लिलावात कांद्याला प्रति क्विंटल कमाल ५,००० रुपये इतका उच्चांकी भाव मिळाला.
कांदा बाजारभाव व आवक पुढीलप्रमाणे:
- कमाल दर: रु. ५,००० प्रति क्विंटल
- किमान दर: रु. १,५०० प्रति क्विंटल
- सरासरी दर: रु. २,८०० प्रति क्विंटल
- एकूण आवक: १,०१३ क्विंटल (तब्बल २,०२६ पिशवी)
फलटण मार्केट यार्डात कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात असून बाजारात कांद्याची आवकही मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.

