फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि २ ऑक्टोबर २०२६):-
सातारा जिल्ह्याच्या सहकार आणि राजकीय वर्तुळाचे केंद्रबिंदू असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Satara DCC Bank) सन २०२६ ते २०३१ या ५ वर्षांच्या कालावधीसाठीच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम सध्या पूर्ण ताकदीने सुरू आहे. जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक अधिकारी संजयकुमार सुद्रिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबवली जात असून एकूण २,०१९ अंतिम मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
अधिकृत निवडणूक कार्यक्रम:
२५ सप्टेंबरपासून सुरू झालेली उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १ ऑक्टोबर २०२६ (सकाळी ११ ते दुपारी ४) रोजी संपली आहे. दाखल झालेल्या सर्व अर्जांची छाननी ५ ऑक्टोबर २०२६ रोजी केली जाईल, तर वैध उमेदवारांची यादी ६ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ६ ते २१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम उमेदवार यादी आणि निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. त्यानंतर रविवारी, १ नोव्हेंबर २०२६ रोजी मतदान पार पडणार असून मंगळवारी, ३ नोव्हेंबर २०२६ रोजी मतमोजणी होऊन अंतिम निकाल जाहीर केला जाईल.

१. सातारा तालुका सोसायटी ना. शिवेंद्रराजे भोसले, सर्जेराव सावंत, बाबासाहेब कदम.
- वाई तालुका सोसायटी क्र. मकरंद पाटील, खा. नितीन पाटील, सत्यजित वीर, दीपक ननावरे.
- कोरेगाव तालुका सोसायटी सुनील माने, सुनील खत्री, घनश्याम शिंदे
- जावली तालुका सोसायटी ज्ञानदेव रांजणे, शशिकांत शिंदे, विठ्ठल गोळे.
- महाबळेश्वर तालुका सोसायटी: रुपाली राजेंद्र राजपुरे, राजेंद्र राजपुरे, संजय मोरे.
६. खंडाळा तालुका सोसायटी: राजेंद्र नेवसे, शामराव गाढवे, नितीन भरगुडे पाटील, संतोष साळुंखे, आनंदराव शेळके पाटील, संजीव गाढवे, अजय भोसले.
७. फलटण तालुका सोसायटी: रामराजे ना. निंबाळकर, समशेरसिंह ना. निंबाळकर, संजीवराजे ना. निंबाळकर, तुकाराम शिंदे, शिवरुपराजे खर्डेकर.
- खटाव तालुका सोसायटी : इंदिरा प्रभाकर घार्गे, प्रभाकर घार्गे, धनंजय चव्हाण, नंदकुमार मोरे, सुनीता धैर्यशील कदम.
- माण तालुका सोसायटी :जयकुमार गोरे, शेखर गोरे,मनोजकुमार पोळ, रामचंद्र माने
१०. पाटण तालुका सोसायटी : ना. शंभूराज देसाई, सत्यजित पाटणकर, याज्ञसेन पाटणकर, अशोकराव पाटील, शशिकांत निकम.
११. कराड तालुका सोसायटी उदयसिंह पाटील, बाळासाहेब पाटील, रामकृष्ण वेताळ, जगदीश जगताप, धनंजय पाटील.
१२. खरेदी विक्री संघ ना. मकरंद पाटील, विश्वासराव निंबाळकर.
१३. कृषी उत्पादन प्रक्रिया: आ. रामराजे नाईक निंबाळकर, राजेंद्र भोईटे, आ. डॉ. अतुल भोसले, राजेश्वरी देशमुख, प्रकाश बडेकर.
१४. नागरी बँका, पतसंस्था आ. मनोज घोरपडे, आ. धैर्यशील कदम, सुरभी मदन भोसले, अनुपमा फाळके, रामराव लेंभे, मनोहर बर्गे, राजेश पाटील, मनोजकुमार पोळ, सुरेंद्र गुदगे, अविनाश कदम, अशोक गोळे, सचिन जाधव, अनिलराजे निंबाळकर, रणजितसिंह ना. निंबाळकर, याज्ञसेन पाटणकर, राजाराम शेलार, विजय पवार, संजीवराजे ना. निंबाळकर, विनोद कुलकर्णी, अमित कदम.
- घरबांधणी, दूध : श्री. छ. खा. उदयनराजे भोसले, ज्ञानेश्वर पवार, काका धुमाळ.
१६. औद्योगिक विणकर, मजूर: शशिकांत शिंदे, सुनील वाघ, अनिल देसाई, महेंद्र देसाई, विक्रम जाधव, मुकुंदराव देसाई, शेखर गोरे, वंदना देसाई, कांतिबाई ढेकळे, चंद्रकांत जाधव, रणजित जाधव, चंद्रकांत कोकाटे, नंदकुमार बर्गे, श्रीमंत झांजुर्णे, हणमंत गायकवाड, अमित कदम, संजय गायकवाड, दाऊद आंबेकरी.
१७/१८. महिला राखीव २ : मोनल साळुंखे, राजेश्वरी देशमुख, सौ.
ऋतुजा पाटील, सौ. पुष्पा पवार, सुरभी मदन भोसले, शशिकला जाधव (देशमुख), प्रमिला कदम, मंगल पाटील, प्रिती घार्गे, विमल गव्हाणे, सुनेत्रा शिंदे, सुनिता भोईटे, जयश्री कदम, कांचन साळुंखे, दीपाली साळुंखे, सुनिता कदम, ऋषिका साबळे पाटील, अल्पना यादव, स्मिता देशमुख, विद्या जगताप, सोनाली पोळ.
- अनुसूचित जाती, जमाती आ. सचिन पाटील, दीपक चव्हाण, रवींद्र
बडेकर, प्रकाश बडेकर, भागवत माने, कामेश कांबळे, राजू जेधे, सुरेश गायकवाड, संदीप शिंदे, सुरेश सावंत, प्रविण धसके, सत्यवान कांबळे, पराग रामुगडे.
२०. विमुक्त जाती भटक्या जमाती: सुनील वाघ, रणजित जाधव, अशोक काकडे, दिनकर शिरतोडे, शकुंतला साबळे, शिवाजीराव शेळके पाटील, लहुराज जाधव, कांताबाई ढेकळे, शिवाजी गोरे, रामचंद्र ढेकळे, तात्यासाहेब धायगुडे, भिमदेव बुरुंगले, आनंदराव शेळके पाटील, तुकाराम शिंदे, अर्जुन काळे, शंकर माडकर, शांताराम शेळके, नवनाथ वलेकर, निशांत गवळी, बाळकृष्ण काळे, दाऊद आंबेकरी.
२१. इतर मागास प्रवर्ग: शेखर गोरे, प्रदीप विधाते, प्रतीक विधाते, योगेश फडतरे, सुरेंद्र गुदगे, सुभाष नरळे, शंकर माळवदे व रज्जाक मुलानी, वसंतराव मानकुमरे, संजय कुंभार, धनंजय पाटील, निवृत्ती पुजारी, जयवंत कुंभार, संदीप पाचांगणे, भरत देशमुख, अशोक मोने, कांचन साळुंखे, सचिन माळी, दिनकर राऊत, शंकर माळवदे, राजाराम शेलार, लक्ष्मण कडव, बाळकृष्ण काळे, संजय गायकवाड.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या २१ ऑक्टोबरपर्यंतच्या मुदतीत सहकार पॅनेलच्या माध्यमातून बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न होतात की प्रत्यक्ष लढती रंगतात, याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे आणि सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

