फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त मुधोजी हायस्कूलमध्ये भव्य रंगभरण स्पर्धेचे आयोजन…

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण, दि २ ऑक्टोबर २०२६): –
फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष आणि श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर (बाबा) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुधोजी हायस्कूल येथे भव्य ‘रंगभरण स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे.
मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (फलटण), मुधोजी हायस्कूल कायमसेवकांची पतसंस्था मर्यादित (फलटण) आणि आदित्य असोसिएटस् यांच्या संयुक्त विद्यमाने व चित्रकला विभागाच्या समन्वयातून ही स्पर्धा पार पडणार आहे.सदर स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून ही स्पर्धा सोमवार, दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८:३० ते १०:०० या वेळेत मुधोजी हायस्कूल, फलटण येथे आयोजित करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये ‘अ’ गट इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी, तर ‘ब’ गट इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!