मुधोजी कनिष्ठ महाविद्यालयाची एनसीसी कॅडेट समीक्षा जगताप हिची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी सातारा जिल्हा संघात निवड..

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि ३ ऑक्टोबर २०२६): –
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने वसई-विरार शहर महानगरपालिका व पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ५३ व्या कुमार गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी मुधोजी कनिष्ठ महाविद्यालय, फलटणची एनसीसी (NCC) कॅडेट व उत्कृष्ट कबड्डी खेळाडू कु. समीक्षा गोरख जगताप हिची सातारा जिल्हा संघात निवड झाली आहे.


वसई-विरार येथे पार पडणाऱ्या या मानाच्या राज्यस्तरीय स्पर्धेत समीक्षा सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. मुधोजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या कबड्डी संघाची खेळाडू असलेल्या समीक्षाने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर जिल्हा संघात स्थान मिळवले आहे. तिच्या या यशामुळे फलटणच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आणि राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झालेल्या निवडीबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, फ.ए.सो. क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, प्राचार्य पी एच कदम, एनसीसी अधिकारी, क्रीडा शिक्षक व क्रीडाप्रेमींनी समीक्षाचे हार्दिक अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!