अजितदादा इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये नवरात्र महाभोंडला उत्सव उत्साहात साजरा

कटफळ येथे भोंडला प्रसंगी विद्यार्थीनी व शिक्षिका

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि १७ ऑक्टोबर २०२६):-
गुरुवार दि. १५ ऑक्टोबर रोजी सद्गुरू श्री वामनराव पै शिक्षण संस्थेच्या अजितदादा इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनि. कॉलेज, कटफळ येथे गुरुवार, नवरात्र भोंडला उत्सव व भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली.

या प्रसंगी पंढरीनाथ प्रतिष्ठानच्या सचिव मा. सौ. अमृताताई प्रशांत काटे , संस्थेचे संस्थापक नानासाहेब मोकाशी, संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोकाशी ,
संस्थेच्या सचिव संगिताताई मोकाशी उपस्तीत होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने हत्तीपूजन, प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. संगीत विशारद शिक्षक सुहास आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पारंपरिक भोंडला व देवीची गीते सादर केली. विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषा परिधान करून आकर्षक गरबा नृत्य सादर केले. या नृत्यामध्ये विद्यार्थिनींसह प्रमुख पाहुण्यांनीही आनंदाने सहभाग घेतला. त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साह, आनंद आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले.


पारंपरिक संस्कृतीचे जतन आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवातून विद्यार्थ्यांना भारतीय परंपरा, संस्कृती आणि सणांचे महत्त्व अनुभवता आले. उत्सवाची सांगता पारंपरिक ‘आडबाई आडोनी ‘ या भोंडला गीताने झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. कल्याणी मॅडम यांनी केले.



Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!