समतेची व सामाजिक ऐक्याची कास धरून भेदभाव यांची जळमटे झटकूया व विश्वव्यापक समाज घडवूया: प्रबोधनकार, ज्येष्ठ साहित्यिक प्रा रवींद्र कोकरे

फलटण टुडे वृत्तसेवा (पाडेगांव,ता फलटण दि १३ एप्रिल २०२६) :- सामाजिक विकास फाउंडेशन आयोजित महापुरुष जयंती महोत्सव वर्ष पाचवे यात प्रथम पुष्प पुण्यश्लोक अहिल्यामाता ते क्रांतीजोती सावित्रीमाई क्रांतीपर्व या विषयांवर मौलिक मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी ऊस संशोधक मोरे साहेब,प्रमुख उपस्थिती पंचायत समिती सदस्य राहूल नरुटे, महेश तावरे, मिलींद कदम, दतात्रय काळे, नितीन सूळ, दादासो नरुटे होते. क्रांती ज्योत प्रज्वलीत करून मान्यवरांचा सत्कार वृक्ष, पुस्तक, महापुरूष प्रतिमा देऊन केला.

दांभिकता, भोंदूबाबा यांचे समाज्यात पेव फुटले आहे.सामान्य जनतेने शेतकऱ्याचा आसूड हाती घेऊन आयोग्य बाबींवर फटकारे मारणे काळाची गरज आहे.गुलामगिरी झुगारून सत्यशोधक दृष्टीने तरुणाईने एकत्रीत येऊन राज सत्तेला जाब विचारणे हीच खरी क्रांती आहे.महिलांनी अत्याचार, अन्याय विरोध आपली नारी शक्ती जागृत करणे आवश्यक आहे. असे विचार प्रा कोकरे यांनी मांडले.
प्रास्ताविक जि.प सदस्य गिरीश बनकर, आभार प्रभाकर नेवसे यांनी मानले. पंचक्रोशीतील बहुसंख्येने व्याख्यानास श्रोता वर्ग उपस्थित होता.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!