फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २६ एप्रिल २०२६):-
फलटण येथील आकाश डान्स स्टुडिओ यांच्या माध्यमातून यंदाच्या उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी विशेष समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या समर कॅम्पमध्ये विविध प्रकारच्या डान्स पद्धती शिकवण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना कला, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकासाची संधी मिळणार आहे.

या समर कॅम्पमध्ये हिप-हॉप, फ्रीस्टाईल, बॉलीवूड, क्लासिकल फ्यूजन, झुंबा, लाठी काठी योगा व प्राणायाम तसेच स्टेज परफॉर्मन्ससाठी आवश्यक असलेल्या विविध नृत्यशैलींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना डान्ससोबतच शिस्त, टीमवर्क आणि स्टेज कॉन्फिडन्स यांचाही अनुभव मिळणार आहे. विशेष म्हणजे, लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सर्व वयोगटांसाठी हा समर कॅम्प खुला ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पालकांकडूनही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

स्टुडिओच्या व्यवस्थापनाने सांगितले की, उन्हाळी सुट्टीचा सदुपयोग करत विद्यार्थ्यांनी एखादी कला व छंद जोपासवा हा या शिबीरा मार्फत मुख्य उद्देश आहे .
तरी सर्वांनी या सुवर्ण संधीचा फायदा घेण्यात यावा . . .
आकाश डान्स स्टुडिओ फलटण
संपर्क : 9890376275 / 9860408143


