उद्यानविद्या व कृषि महाविद्यालय, फलटण येथे मेगा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

फलटण टुडे वृत्तसेवा( फलटण दि ३० एप्रिल २०२६):- फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २९ एप्रिल रोजी ‘मेगा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह’चे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. मेगा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह’ सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित केला असून एकूण १२ विविध अग्रगण्य कंपन्यांनी सहभाग घेतला आहे तसेच १०२ विद्यार्थ्यांनी मुलाखतींसाठी सहभाग नोंदविला आहे. मेगा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे उद्घाटन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सचिव, फलटण एज्युकेशन सोसायटी तथा माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद सातारा यांच्या हस्ते होणार आहे. मेगा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हमुळे आधुनिक कृषी क्षेत्रातील रोजगाराच्या वाढत्या संधींबाबत माहिती मिळेल व कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित होईल तसेच थेट उद्योगक्षेत्राशी संवाद साधण्याची व रोजगाराच्या संधी मिळवण्याची उत्तम संधी उपलब्ध करण्यास मदत होईल. मेगा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. एस. डी. निंबाळकर, प्राचार्य श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व डॉ. यू. डी. चव्हाण, प्राचार्य, कृषी महाविद्यालय, फलटण यांनी विशेष प्रयत्न केले आहेत तसेच प्रा. शिंदे ए. ए. व प्रा. यादव एन. ए. यांनी समन्वयक म्हणून कार्य पार पाडत मेगा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे संपूर्ण नियोजन व आयोजन करण्यात आले आहे. या ‘मेगा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह’मुळे विद्यार्थ्यांना उद्योगजगताशी थेट संपर्क साधण्याची मौल्यवान संधी मिळाली असून त्यांच्या करिअर घडविण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे अशी आशा आयोजकांनी व्यक्त केली.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!