मुधोजी ज्युनियर कॉलेज ने १२ वी बोर्ड परीक्षेच्या निकालाची परंपरा याही वर्षी जपली

याही वर्षी निकालात मुलिंची बाजी

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण , दि ०४ मे २०२६):-
फलटण एज्युकेशन सोसायटी च्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज च्या शैक्षणिक . वर्ष २०२५- २६ च्या इयत्ता १२ वी एच एस एस सी बोर्ड च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून उज्जवल यशाबरोबरच मागील वर्षाप्रमाणेच निकालाची परंपरा कायम ठेवून आर्टस्, कॉमर्स, विज्ञान, शाखेत बाजी मारली आहे. एच एस सी बोर्ड परीक्षेसाठी आर्टस्, कॉमर्स, विज्ञान शाखेत मिळून एकूण ७१७ विद्यार्थी बसले होते यामध्ये ६६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
यामध्ये विशेष श्रेणी २६ विद्यार्थ्यांना यामध्ये १ कला शाखेतील विद्यार्थ्यांना,९ वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना तर १६ विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना मिळाली. तर प्रथम श्रेणी १८३ विद्यार्थ्यांना मिळाली यामध्ये कला शाखेतील १९,वाणिज्य शाखेतील ४७ तर विज्ञान शाखेतील ११७ विद्यार्थ्यांना मिळाली आहे.यंदाच्या बारावीच्या (एच एस सी बोर्ड) परीक्षेत मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण येथून विज्ञान शाखेतील एकूण ४१२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये ४०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले व विज्ञान शाखेचा निकाल ९९.२७% लागला. तर वाणिज्य शाखेतील एकूण २१२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये १७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले व वाणिज्य शाखेचा निकाल ८३.४९ % लागला. तर कला शाखेतील एकूण ९३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये ८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले व कला शाखेचा निकाल ८८.१७ % लागला.

शाखा. क्रमांक. विद्यार्थ्याचे नाव. गुण. % गुण.

कला. प्रथम यशराज मदने ४७९ ७९.८३%
द्वितीय अंजली कदम. ४४३ ७३.८३%
तृतीय सई चव्हाण. ४३९ ७३.१७%
वाणिज्य . क्रमांक विद्यार्थ्याचे नाव. गुण. % गुण
प्रथम अश्विनी नेवसे ५४५ ९०.८३%
द्वितीय . प्रणिता कांबळे ५२१ ८६.८३%
तृतीय पूनम कचरे ४९३ ८२.१७%
विज्ञान . क्रमांक. विद्यार्थ्याचे नाव. गुण. % गुण.
प्रथम सिद्धांत साळुंखे ५३६ ८९.३३%
द्वितीय सई सुर्वे ५१२ ८५.३३%
तृतीय. संस्कृती फरांदे. ५०९ ८४.८३%

वरील सर्व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार मा.श्री दीपकराव चव्हाण ,फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर,सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,फलटण एजुकेशन सोसायटी चे प्रशासन अधिकारी मा. अरविंद निकम, तपासणी अधिकारी मा.दिलीप राजगुडा , सहायक तपासणी अधिकारी मा.सुधीर अहिवळे, मा.प्राचार्य वसंतराव शेडगे, ज्युनियर कॉलेज उपप्राचार्य मा.सोमनाथ माने,माध्यमिकचे उपप्राचार्य मा ए वाय ननवरे , माध्यमिकचे पर्यवेक्षक मा राजेंद्र नाळे, मा रावसाहेब निंबाळकर , पर्यवेक्षिका सौ पूजा पाटील,फलटण एजुकेशन सोसायटी नियामक मंडळ सदस्य ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!