श्रीमंत रामेश्वर महागणपती (फलटणचा राजा) यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन; शुक्रवार पेठ तालीम मंडळाचा उपक्रम..

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण. दि १७ सप्टेंबर २०२६):-
गणेशोत्सवाचे औचित्य साधून शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळ, फलटण यांच्या वतीने ‘नवसाला पावणारा’ श्रीमंत रामेश्वर महागणपती (फलटणचा राजा) यांच्या कृपाशीर्वादाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे रक्तदान शिबीर शुक्रवार, दिनांक १८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता श्रीमंत रामेश्वर महागणपती मंदिर, शुक्रवार पेठ, फलटण येथे पार पडणार आहे.

Screenshot


“आरोग्य यज्ञात सहभागी होऊ या, रक्तदान करून देशकार्य आणि देवकार्यात सहभागी होऊ या” असा संदेश देत, या सामाजिक व आरोग्यदायी उपक्रमात फलटण परिसरातील नागरिक, तरुण व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे, असे नम्र आवाहन शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!