पूर्वा कोळेकरची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी; दिल्ली येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली निवड

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २३ ऑक्टोबर २०२६):-
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत फलटण तालुक्यातील नांदल गावची सुकन्या पूर्वा प्रिया नवनाथ कोळेकर हिने ५३ किलो वजनी गटात अव्वल स्थान पटकावत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. या दैदिप्यमान आणि उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर तिची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
पूर्वा कोळेकर ही मूळची सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील नांदल येथील रहिवासी असून, तिचे वडील नवनाथ कोळेकर हे सध्या नवी मुंबई पोलीस दलात सेवेत कार्यरत आहेत. पूर्वा हिने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत आपल्या आक्रमक आणि कौशल्याने भरलेल्या खेळाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत हे सुवर्णपदक मिळवले.


तिच्या या गगनभरारीमुळे कोळेकर कुटुंबासह संपूर्ण नांदल गाव, फलटण तालुका आणि नवी मुंबई पोलीस दलात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यस्तरावर सुवर्ण यश मिळवून राष्ट्रीय स्पर्धेत धडक मारणाऱ्या पूर्वाकडून आता दिल्ली येथील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतही चमकदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तिच्या या यशाबद्दल सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना शंभूराज देसाई , माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण व शिवसेना पदाधिकारी व सर्व स्तरांतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!