कु. कृपा प्रशांत रणवरे राज्यात तिसरी
कु. कृपा प्रशांत रणवरे चा सत्कार करताना प्राचार्य वसंत शेडगे , उपप्राचार्य ए वाय ननवरे, उपप्राचार्य सोमनाथ माने, पर्यवेक्षक आर बी निंबाळकर, आर एस नाळे,सौ पूजा पाटील व विषय शिक्षक
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि ०२ मे २०२६):-
भारती विद्यापीठा अंतर्गत दिनाक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे घेण्यात आलेल्या इंग्रजी बहिःस्थ (इंग्रजी – एन्ट्रन्स् )परीक्षेत फलटण एज्युकेशन सोसायटी च्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मधील इयत्ता सातवीत शिकणारी विद्यार्थीनी कु. कृपा प्रशांत रणवरे हिने इयत्ता ७ वी इंग्रजी – एन्ट्रन्स् परीक्षेत १०० पैकी ९६ गुण प्राप्त करून राज्यामध्ये तृतीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल तिला रोख रकमेचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

इंग्रजी बहिःस्थ (इंग्रजी – एन्ट्रन्स् )/(इंग्रजी – प्रायमरी )परीक्षेत फलटण एज्युकेशन सोसायटी च्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजने सलग चौथ्या वर्षी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली व प्रशालेच्या कु. कृपा प्रशांत रणवरे च्या रूपाने राज्यपातळीवर आपला ठसा पुन्हा एकदा उमटवला आहे . तसेच प्रशालेतील अनेक विद्यार्थ्यानी घवघवीत असे यश संपादन करत नावलौकिक मिळवला आहे .

या परीक्षेसाठी विद्यालयातील इयत्ता ६ वी इंग्रजी प्रायमरी परीक्षेत एकूण ९१ विद्यार्थी बसले होते यामध्ये ३७ विद्यार्थ्यानी विशेष प्राविव्य मिळवले तर १२ विद्यार्थ्यानी प्रथम श्रेणी प्राप्त केली. तर
इयत्ता ७ वी इंग्रजी एन्ट्रन्स् परीक्षेत एकूण ११७ विद्यार्थी बसले होते यामध्ये ६० विद्यार्थ्यानी विशेष प्राविव्य मिळवले तर २२ विद्यार्थ्यानी प्रथम श्रेणी प्राप्त केली.

वरील सर्व विद्यार्थ्यांना इंग्रजी एन्ट्रन्स् परीक्षेसाठी विद्यालयातील इंग्रजी बाह्य परीक्षा विभाग प्रमुख श्री अमोल सपाटे, इंग्रजी विभाग प्रमुख सौ. सोहनी सस्ते, विषय शिक्षक श्री सचिन धुमाळ, कु संगीता कदम, सौ मुक्ता शिंदे व कु सुषमा घोरपडे, सौ विभा गुजर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले

कु. कृपा प्रशांत रणवरे च्या यशाबद्दल त्याचे व तिला मार्गदर्शन करणारे विषय शिक्षकांचे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार मा. श्री दीपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदे चे माजी अध्यक्ष मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्यूकेशन सोसायटी च्या नियामक मंडळाचे सर्व सदस्य, प्रशासन अधिकारी श्री अरविंद निकम, तपासणी अधिकारी श्री दिलीप राजगुडा, सहाय्यक तपासणी अधिकारी श्री सुधीर अहिवळे,प्रशालेचे प्राचार्य श्री वसंतराव शेडगे , उपप्राचार्य श्री ए वाय ननवरे, ज्युनियर कॉलेज चे उपप्राचार्य श्री सोमनाथ माने, माध्यमिक विभाग पर्यवेक्षक श्री राजेंद्र नाळे, श्री आर बी निंबाळकर , पर्यवेक्षिका सौ पूजा पाटील ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी अभिनंदन केले


