फलटण एज्युकेशन सोसायटीच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष सोहळ्याचे आयोजन

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि २४ ऑगस्ट २०२६):-
फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटणच्या वतीने संस्थेच्या ७५ व्या वर्धापन दिनाचे आणि ‘मुधोजी दिना’चे औचित्य साधून भव्य सत्कार समारंभ व वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता शिंगणापूर रोडवरील अनंत मंगल कार्यालय, फलटण येथे पार पडणार आहे.
या सोहळ्यात सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात विशेष गुणवत्ता प्राप्त शाखा, राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक, खेळाडू, गुणवंत विद्यार्थी आणि सेवानिवृत्त सेवकांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये:


अध्यक्ष: मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (अध्यक्ष, फलटण एज्युकेशन सोसायटी व मा. सभापती, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य)
शुभहस्ते: मा. श्री. चंद्रकांत नारायण दळवी, IAS (Retd.) (चेअरमन, रयत शिक्षण संस्था, सातारा)

Screenshot

प्रमुख उपस्थिती:
या सोहळ्यास संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्राचार्य विश्वासराव मुगुटराव देशमुख, मा. श्री. जगजीवन हिरजी मिस्त्री, मा. श्री. अशोक जिवराज डोशी, गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे विक्रमसिंह नाईक निंबाळकर, सेक्रेटरी मा. श्रीमंत संजीवराजे विजयसिंह नाईक निंबाळकर, व्हॉ. चेअरमन मा. श्री. रमणलाल आनंदलाल डोशी, खजिनदार मा. श्री. हेमंत वसंतराव रानडे आणि प्रशासन अधिकारी मा. श्री. अरविंद निकम यांसह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!