दरपत्रक सादर करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन

फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि. ३१ जुलै २०२६):- सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सातारा सामाजिक न्याय विभागांतर्गत जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी अन्नधान्य, किराणा साहित्य, पुरवठा करण्यासाठी सन २०२६-२७ या कालावधीसाठी ई-निविदा मागविण्यात येत आहेत.  

  दरपत्रक सादर करण्याचा कालावधी ३  ते ९ ऑगस्ट 2026 रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. तर तांत्रिक दरपत्रक उघडण्याची   दि. १० ऑगस्ट 2026 रोजी दुपारी ३.३० वाजेपर्यंत. दरपत्रकाच्या अटी, शर्ती व सविस्तर माहिती www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी दरपत्रक विहित मुदतीत ऑनलाईन सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!