नांदल येथे श्रीसंत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयात स्वच्छतागृहाचे उद्घाटन संपन्न

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण , दि ११ सप्टेंबर २०२६): –
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित नांदल येथील श्रीसंत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयात कमिन्स इंडिया प्रा. लि. आणि फलटण एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या नूतन स्वच्छतागृहाचा उद्घाटन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.

Screenshot


या स्वच्छतागृहाचे उद्घाटन फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कमिन्स प्लांट चीफ राजेंद्र माने, सी.एस.आर. लीडर प्रवीण गायकवाड आणि सचिन खडके यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी स्कूल कमिटीचे व्हाईस चेअरमन नितीन गांधी, सदस्य चंद्रकांत पाटील, पांडुरंग तात्या कोळेकर, शिवाजी काका कोळेकर, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य मनोज कुमार दळवी, तरडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख कुंभार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नामदेव कोळेकर, सदस्य देवीदास कोळेकर, ग्रामविकास अधिकारी कारंडे, विकास सोसायटीचे चेअरमन विनायक कोळेकर, माजी उपसरपंच डी. वाय. कोळेकर, राजेंद्र धायगुडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक काळे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. या प्रसंगी बोलताना मान्यवरांनी शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धतीचे आणि उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी-सुविधांचे विशेष कौतुक केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावंत आणि जे. एच. निंबाळकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सावंत यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोळी, वळवी, तोडकर, टी. टी. निंबाळकर, श्रीम. तरटे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी राऊत, बापूराव सरक आणि संजय मुळीक यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!