मुधोजी हायस्कूलचे उपशिक्षक राजकुमार पवार यांनाग्लोबल एलिट मीडिया अँड टेक ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

फलटण टुडे वृत्तसेवा ( पुणे, दि १७ सप्टेंबर २०२६): – ग्लोबल एलिट मीडिया अँड टेक यांच्या वतीने दिला जाणारा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे उपशिक्षक तथा तरडगावचे सुपुत्र राजकुमार मारुती पवार यांना जाहीर झाला आहे. सिम्बायोसिस कॉलेज, पुणे येथे पार पडलेल्या भव्य सोहळ्यात ‘यशदा’ पुणेचे ॲडिशनल कलेक्टर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

Screenshot


शैक्षणिक उत्कृष्टता आणि मूल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या असाधारण योगदानाबद्दल राजकुमार पवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पवार यांनी मुधोजी हायस्कूलमध्ये सलग २९ वर्षे गणित व विज्ञान विषयाचे अध्यापन करताना शेकडो विद्यार्थी घडवले आहेत. त्यांनी बालभारतीच्या व्हर्च्युअल क्लासमध्ये सहभाग, NCERT च्या शैक्षणिक मंडळात कार्य, भोपाळ येथे NPE-२०२० मधील सहभाग, तसेच १० वी सेतू अभ्यासक्रम निर्मितीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. यापूर्वी त्यांना शाळा स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

Screenshot


या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, प्राचार्य वसंत शेडगे, उपप्राचार्य ए. वाय. ननावरे, सोमनाथ माने यांच्यासह सर्व शिक्षकवृंद व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!