फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण , दि २१ सप्टेंबर २०२६):-
आगामी गणेश उत्सव २०२६ शांततेत, उत्साहात आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखुन पार पडावा यासाठी मागील काही वर्षात गणेश उत्सव तसेच इतर उत्सव काळात गुन्हे दाखल असलेल्या इसमांकडुन पुन्हा गणेश उत्सव काळात गैरकृत्य घडु नये म्हणुन दिनांक २४/०९/२०२६ रोजीचे ००.०१ ते दिनांक २६/०९/२०२६ रोजीचे १२.०० वा. पर्यंतच्या कालावधीत पोलीस ठाणे हद्दीत व तालुका हद्दीत वावर करु नये / थांबु नये या करीता खालील नमुद इसमांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३(२) नुसारं मनाई आदेश पारीत करण्यात आला आहे. ते पुढील प्रमाणे

विशाल पांडुरंग माळी (सगुणामाता नगर, मलठण, फलटण), देविदास बापु माळी (सगुणामाता नगर, मलठण, फलटण), संपत भरत माळी (सगुणामाता नगर, मलठण, फलटण), अजय पांडुरंग माळी (सगुणामाता नगर, मलठण, फलटण) रंगराव भरत माळी (सगुणामाता नगर, मलठण, फलटण), अमर राजु माळी (सगुणामाता नगर, मलठण, फलटण), नेताजी प्रकाश माळी (सगुणामाता नगर, मलठण, फलटण), प्रकाश काळुराम माळी (सगुणामाता नगर, मलठण, फलटण), अमोल आकाराम मोरे (सगुणामाता नगर, मलठण, फलटण), रमेश संजय माळी (सगुणामाता नगर, मलठण, फलटण), अजय रघुनाथ माळी (सगुणामाता नगर, मलंठण, फलटण), करण संजय सरगर (खाटीकगल्ली, फलटण), मंगेश किसन बेंद्रे (खाटीकगल्ली फलटण), रोहन महेश सरगर (खाटीकगल्ली फलटण), किशोर धनराज पवार (कसबापेठ फलटण), धनराज. लक्ष्मण पवार (कसबापेठ फलटण), अमित अनिल कदम (रविवारपेठ फलटण), राहुल बजरंग पोतेकर (रविवारपेठ फलटण), सुरज हिंदुराव कदम (रविवारपेठ फलटण), बजरंग राजेंद्र खलाटे (रविवारपेठ फलटण), वरद विद्याधर भोईटे (नरसिंहचौक फलटण), प्रविण तुळशीराम नाळे (जाधववाडी फलटण) किरण कुमार घोरपडे (ढवळ फलटण) अजय संभाजी भोसले (शेलारवस्ती ठाकुरकी) अभिजित जयवंत खराडे (पवारगल्ली, फलटण) सचिन जयवंत खराडे (पवारगल्ली, फलटण) महेश विलास आवारे (मंगळवारपेठ, फलटण) हेमंत दत्तात्रय शिरतोडे (रविवारपेठ, फलटण) शिवाजी जगन्नाथ डोईफोटे (नवामळा ठाकुरर्की) बिलाल रफिक कुरेशी (कुरेशीनगर, फलटण) झिशान ऊर्फ दिशान इमाम बेपारी ऊर्फ कुरेशी (कुरेशीनगर, फलटण) आबु ऊर्फ अल्ताब अफसर कुरेशी, (कुरेशीनगर, फलटण) मुबारक हनिफ कुरेशी, (कुरेशीनगर फलटण) शाहरुख जलील कुरेशी (कुरेशीनगर फलटण) अजिम शब्बीर कुरेशी (कुरेशीनगर फलटण) शंकर रामराव जुवेकर (महतपुरापेठ फलटण) अजय संजय जाधव (महतपुरापेठ फलटण) यांचा सामावेश आहे.

दरम्यान बीएनएसएस १६८ प्रमाणे १४७० इसमांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत तसेच एक तडीपार प्रस्ताव तयार करुन वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणुन बीएनएसएस कलम १२६ प्रमाणे ९४, बीएनएसएस कलम १२९ प्रमाणे ०३, प्रोव्ही अॅक्ट प्रमाणे ०७, मपोका १२२ प्रमाणे ०२, मपोका १०२ प्रमाणे ०९ वाहन चालकाविरुध्द खटले दाखल करण्यात आले आहेत, तसेच गणेश उत्सव अनुशंगाने शांतता कमिटी बैठक ०५, पोलीस मित्र बैठक ०७, पोलीस नागरिक समन्वय बैठक १०, इतर विभाग समन्वय बैठक १२ बैठका घेण्यात आल्या या बैठकींमध्ये गणेश मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि नागरीकांना उत्सव काळात शांतता व सलोखा राखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा. श्री निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक सो सातारा, मा. डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधिक्षक सो, सातारा, श्री धन्यकुमार गोडसे, उपविभागीय पोलीस अधिकारी सो फलटण विभाग यांचे मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाणेचे प्रभारी श्री घनशाम बल्लाळ यांनी केली आहे.


