होलार समाज्याच्या विकासा साठी कटिबद्ध : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महसूल मंत्री चंद्रशेखरइ बावनकुळे यांना निवेदन देताना माणिकराव भंडगे ,गोरख पारसे

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती, दि १९ ऑगस्ट २०२६):-
राज्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त व सर्व सेवा सुविधा असणारे होलार समाज भवन बांधून देऊ व
होलार समाज्याच्या विकासा साठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
मुंबई येथे राष्ट्रीय होलार समाज संघ चे राष्ट्रीय नेते व राष्ट्रवादी काँग्रेस चे राज्य सरचिटणीस माणिकराव भंडगे व बारामती नगरपरिषद चे नगरसेवक गोरख पारसे यांच्या नेतृत्वाखाली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन होलार समाज्याच्या समस्या व ठाणे येथील शासकीय जागेवर होलार भवन बांधावे ज्या मुळे राज्यस्तरीय विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक,सांस्कृतिक कार्यक्रम घेता येतील व गरीब ,आर्थिक दृष्ट्या दुर्लक्ष राज्यातील होलार समाज्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा साठी अभ्यासिका या मध्ये करता येईल

Screenshot


आशा विविध मागण्याचे निवेदन दिले या प्रसंगी चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिष्टमंडळाला होलार समाज्यासाठी शासकीय जागा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले
या प्रसंगी संतोष जाधव, बालाजी गुळवे, दीपक गुळवे ,शेखर अहिवळे, नारायण ढोबळें,हिरामण माने, निवृत्ती गोरे, बाळासाहेब जाधव ,सूरज देवकाते आदी होलार समाज बांधव उपस्तीत होते
होलार समाज आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी होलार समाज भवन ही काळाची गरज असल्याचे नगरसेवक गोरख पारसे यांनी सांगितले

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!