सातारा जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत वेदिका कवडे हिचे उल्लेखनीय यश..

फलटण टुडे वृत्तसेवा ( म्हसवड दि १७ सप्टेंबर २०२६ ): – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा आणि चेस असोसिएशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातारा जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत म्हसवड येथील सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कु. वेदिका कवडे हिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Screenshot


ही स्पर्धा १७ व १८ सप्टेंबर २०२६ रोजी श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे पार पडली. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील नामांकित बुद्धिबळपटूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या सामन्यांमध्ये वेदिकाने आपल्या उत्कृष्ट बुद्धिबळ कौशल्याचे प्रदर्शन करत विजय संपादन केला.
या यश बद्दल सिद्धनाथ हायस्कूलचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, सर्व शिक्षकवृंद तसेच पालकांनी तिचे कौतुक केले आणि आगामी क्रीडा प्रवासासाठी तिला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!