*लडकत स्कूल ऑफ फाउंडेशन चा विद्यार्थी संस्कार सूर्यवंशी शासकीय कुस्ती स्पर्धेत तालुक्यात प्रथम

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि २० सप्टेंबर २०२६):-
बारामती येथील कुस्ती केंद्रात शासकीय तालुकास्तरीयस कुस्ती स्पर्धेत लडकत स्कूल ऑफ फाउंडेशनचा विद्यार्थी संस्कार सूर्यवंशी यांनी 65 किलो वजन गटांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला व त्याची निवड पुणे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी झालेली आहे
लडकत स्कूल ऑफ फाउंडेशन येथे इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत जेईई व नीट फाउंडेशनचे कोर्सेस शिकवले जातात याचबरोबर मंथन आय एम विनर शिष्यवृत्ती तसेच विविध क्रीडा स्पर्धा बुद्धिबळ धावणे, खो-खो मल्लखांब कुस्ती बॉक्सिंग शासकीय चित्रकला संगीत यांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते या संस्थेने आतापर्यंत हजारो डॉक्टर व इंजिनिअर घडवले आहेत त्याचबरोबर आता क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा ठसा उमटवत आहे
याप्रसंगी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक अनिल काशीद व रणजीत दोडमिसे यांचे मार्गदर्शन लाभले
संस्थेच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन नामदेव लडकत सचिव गणेश लडकत व संचालिका शुभांगी व प्रियंका लडकत प्राचार्य रामचंद्र वाघ व तानाजी गवळी यांनी सर्वांचे आभार मानले याप्रसंगी भविष्य काळामध्ये विद्यार्थ्यांना विविध खेळाचे आधुनिक प्रशिक्षण देणारे सुसज्य अशा सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचे आश्वासन चेअरमन नामदेव लडकत यांनी सांगितले

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!