जिल्हास्तरीय लॉन टेनिस स्पर्धेत मालोजीराजे शेती विद्यालयाचे सुयश; दोन विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेत निवड

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि १९ सप्टेंबर २०२६):-
सातारा येथील ऑफिसर्स क्लब येथे पार पडलेल्या सातारा जिल्हास्तरीय लॉन टेनिस क्रीडा स्पर्धेत फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे.
या स्पर्धेत विद्यालयाचे खेळाडू यशराज महामुलकर आणि सुरेश ढगे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उल्लेखनीय यश संपादन केले. या शानदार कामगिरीच्या जोरावर दोन्ही विद्यार्थ्यांची आगामी विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, प्राचार्य बाळकृष्ण काळे, उपप्राचार्य सौ. पूनम कदम, उपमुख्याध्यापक माडकर, पर्यवेक्षक सी. टी. कर्वे आणि क्रीडा विभागाच्या वतीने यशराज व सुरेश यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले, तसेच पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक उत्तमराव घोरपडे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशामुळे मालोजीराजे शेती विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!