फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा, दि.23 सप्टेंबर २०२६):- आंतरराष्ट्रीय स्तरावर 28 सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. माहितीच्या अधिकार अधिनियम या कायदयातील तरतुदी आणि कार्यपध्दती, विविध दृकश्राव्य माध्यमातून व्यापक प्रसिध्दी देवून व विविध उपक्रम राबवुन जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी या दिवशी शालेय शिक्षण व उच्च तंत्रशिक्षण विभागाने सर्व शाळा, महाविद्यालये,विद्यापीठे व इतर शैक्षणीक संस्थामध्ये माहितीचा अधिकार या विषयावर आधारित प्रश्न मंजूषा, चित्रकला, निबंध, व वक्तृत्व, स्पर्धा,चर्चासत्रे, व्याख्यानमाला,इत्यादी उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

जिल्हयातील शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद , सहायक धर्मादाय आयुक्त, सर्व उपविभागीय अधिकारी , सर्व तहसीदार व सातारा जिल्हयातील सर्व शासकीय विभाग प्रमुखांना महितीचा अधिकार दिन 28 सप्टेंबर रोजी साजरा करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.
तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की माहिती अधिकार बाबत
जनजागृती होण्यासाठी 28 सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांनी केले आहे.


