महाराष्ट्र शासन कृषि विभाग आणि कृषि मित्र शेतकरी स्वयंसहायता समुह यांच्या संयुक्त विद्यमाने माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण / पिराचीवाडी, दि १ जुलै २०२६):-
पीराचीवाडी (ता.फलटण) महाराष्ट्र शासन कृषि विभाग आणि कृषि मित्र शेतकरी स्वयंसहायता समुह यांच्या वतीने, तालुका कृषी अधिकारी फलटण दत्तात्रय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दि.१ जुलै २०२६ रोजी कृषी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .
यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी भारती ग्रीन टेक चे संचालक विनय पोळ यांनी बीज संस्करण आणि विवीध जिवाणू संवर्धणांचे किड नियंत्रण व जमिनीच्या सुपीकते साठी महत्त्व तसेच पिकांना त्रासदायक ठरणाऱ्या हुमणी किडीचे एकात्मिक नियंत्रण याविषयी उपस्थीत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रसंगी ते म्हणाले की, जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी सेंद्रीय पदार्थाचा अधिकाधीक वापर केल्यास जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून जमीनी तील उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढते परिणामी पीका च्या उत्पादन आणि गुणवत्ते मध्ये भरीव वाढ होते.

Screenshot

‘एल निनो’ हवामान परिस्थीती सावटा च्या पार्श्वभुमीवर संभाव्य दुष्काळी परिस्थितीस सामोरे जाताना करावयाचे आपत्कालीन पीक नियोजन या विषयी बोलताना व कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना सहाय्यक कृषी अधिकारी योगेश भोंगळे यांनी सांगीतले की,कमी पाण्यावर व कमी कालावधीत येणाऱ्या बाजरी व घेवडा पिकाचे व्यवस्थापन करताना पाण्याचा ताण सहन करणाऱ्या वाणांची निवड आणि ‘रुंद वरंबा सरी’ (बीबीएफ) पद्धतीने योग्य ओलीवर व खोलीवर पेरणी तसेच एकात्मिक खत व्यवस्थापन या महत्वाच्या बाबी असून शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.कार्यक्रमाचे आयोजन कल्याण बागल व गणपत सावंत यांनी केले.यावेळी भगवान वाघ, विष्णू बागल,निलेश सावंत हिम्मत बागल, अभिजीत सावंत, वैभव बागल, अक्षय बागल आदि प्रगतीशील शेतकरी उपस्थित होते.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!