कै. जगजीवन हिरजी गरवालिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माळजाई मंदिर येथे शोकसभा संपन्न

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि ४ ऑक्टोबर २०२६):- : लायन्स क्लब ऑफ फलटणचे संस्थापक सदस्य, अंबाई माळजाई मंदिर देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, फलटण एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष तसेच रविवार पेठ उघडा मारुती देवस्थानचे अध्यक्ष कै. श्री. जगजीवन हिरजी गरवालिया (मिस्त्री) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आज माळजाई मंदिर येथे भावपूर्ण शोकसभा आयोजित करण्यात आली. या शोकसभेस फलटण शहरातील सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी, व पत्रकार, व लायन्स क्लब ऑफ फलटणचे पदाधिकारी व सदस्य, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया फलटण सेंटरचे पदाधिकारी व सदस्य, गरवालिया कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शोकसभेचे प्रास्ताविक लायन मनुभाई पटेल यांनी केले. त्यांनी कै. मिस्त्री यांच्या सार्वजनिक जीवनातील सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेत त्यांच्या कार्याच्या विविध पैलूंना उजाळा दिला.

यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), ज्येष्ठ पत्रकार श्री. रवींद्र बेडकिहाळ, लायन्सचे माजी प्रांतपाल श्री.भोजराज नाईक निंबाळकर, द्वितीय प्रांतपाल श्री. मंगेशशेठ दोशी, लायन्स झोन चेअरमन सौ.संध्या गायकवाड तसेच श्री.जीवन माधवराव शिंदे प्रा.श्री.अरुण इंगळे सर यांनी आपल्या मनोगतातून कै.जगजीवन हिरजी गरवालिया यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या सामाजिक बांधिलकीबरोबरच धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची आठवण करून देत त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

ज्येष्ठ पत्रकार श्री.अरविंदभाई मेहता हे बाहेरगावी असल्यामुळे त्यांनी ध्वनिमुद्रित संदेशाद्वारे कै. मिस्त्री यांच्याशी असलेल्या मागील सुमारे ५० वर्षांच्या ऋणानुबंधांना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

या शोकसभेस लायन्स क्लब ऑफ फलटणचे अध्यक्ष श्री. रणजीत बर्गे, सचिव लायन श्री. प्रमोद निंबाळकर, ट्रेझरर श्री दिलीप शिंदे सर श्री. चंद्रकांत कदम, श्री. रतन्सीभाई पटेल, श्री.शैलेंद्र शहा श्री.सुरेशराव भोंगळे, श्री.राजीव नाईक निंबाळकर, डॉ.कांतीलाल गांधी, डॉ.अशोक व्होरा, श्री.स्वप्नीलभैया पाटील,श्री.बापू उर्फ प्रमोद जगताप, श्री.सुशील अग्रवाल, श्री.शैलेंद्र निंबाळकर, श्री.अनिल शिरतोडे, श्री.रवींद्र जंगम,श्री.कमाशेठ पटेल, श्री.अरविंद पटेल, श्री.भाऊ कापसे, श्री.रविशेठ अग्रवाल यांच्यासह लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

तसेच बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, फलटण सेंटरचे प्रमुख पदाधिकारी व सदस्य, श्री.राजूशेठ व महेशशेठ गरवालिया व कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कै. जगजीवन हिरजी गरवालिया यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

कै. मिस्त्री यांनी फलटणच्या सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात दिलेले योगदान आणि विविध संस्थांच्या उभारणीसाठी केलेले कार्य हे सदैव स्मरणात राहील, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. त्यांच्या कार्यातून पुढील पिढीला सामाजिक बांधिलकीची प्रेरणा मिळत राहील,असा विश्वासही उपस्थितांनी व्यक्त केला.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!