नगरपरिषद आवारात अजितदादा चा अर्ध पुतळा करा:नगरसेवक गोरख पारसे व होलार समाज्याची मागणी

स्व अजितदादा पवार यांचा अर्धपुतळा नगरपरिषद आवारात करा याचे मुख्यधिकारी पंकज भुसे यांना निवेदन देताना नगरसेवक गोरख पारसे

फलटण टुडे वृत्तसेवा ( बारामती दि ११ ऑगस्ट २०२६):-
स्वर्गीय अजित दादा पवार यांनी राज्यमंत्री ते उपमुख्यमंत्री काळात बारामती नगरपरिषद च्या विविध विकास कामांना वेळोवेळी भरपूर निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे बारामती शहरातील नागरिकांना रस्ता, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य ,उद्यान,सुशोभिकरण आदी बाबी उपलब्ध झाल्या बारामती नगरपरिषद असून सुद्धा विदर्भ मराठवाड्यातील महापालिका मध्ये ज्या सेवा सुविधा नाहीत त्या बारामती मध्ये उपलब्ध झाल्या ,निधी मिळाला त्याचप्रमाणे बारामती नगरपरिषद ची देखणी इमारत उभी राहिली त्यामुळे अजितदादा चे योगदान विचारात घेता बारामती नगरपरिषद च्या आवारात कै. लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्या शेजारी स्व.अजितदादा पवार यांचा अर्धेपुतळा उभा करून करावा म्हणजे नवीन पिढीला प्रेरणादायी होईल व सर्व नगरसेवक ,अधिकारी ,कर्मचारी,नागरिक यांना नगरपरिषद मध्ये प्रवेश करताना अर्ध पुतळा चे दर्शन घेता येईल असे निवेदन राष्ट्रीय होलार समाज्याच्या वतीने नगरसेवक गोरख पारसे यांनी मुख्यधिकारी पंकज भुसे यांना दिले.


या प्रसंगी संतोष जाधव, बाळासाहेब जाधव,शांताराम गुळवे, नारायण डोंबाळे,बालाजी गुळवे, शेखर अहिवळे, व राष्ट्रीय होलार समाज संघ चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्तीत होते.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!