फलटण येथे ६ ऑक्टोबरला दहावे ‘नांदी साहित्य संमेलन’; ग्रंथ प्रदर्शनासाठी साहित्यकृती पाठवण्याचे आवाहन

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण , दि २८ सप्टेंबर २०२६ ):: –जानेवारी २०२७ मध्ये पुण्यात संपन्न होणार्‍या ऐतिहासिक १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची पूर्वतयारी आणि राज्यभरात साहित्यिक वातावरण निर्मितीसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) वतीने ‘नांदी संमेलनांची’ मालिका सुरू आहे. याच उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून मसाप शाखा फलटणच्या वतीने मंगळवार, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी फलटण येथे १० व्या नांदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलच्या प्रांगणात संपन्न होणार आहे.

या संमेलनाच्या निमित्ताने भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या ग्रंथ प्रदर्शनासाठी फलटणसह माण व खंडाळा तालुक्यातील साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृती दोन प्रतींमध्ये ४ ऑक्टोबर २०२६ पर्यंत आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय, खजिना हौदानजिक, फलटण येथे पाठवाव्यात, असे आवाहन मसाप फलटण शाखेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी केले आहे. या ग्रंथ प्रदर्शनासाठी फलटण, खंडाळा व माण तालुक्यातील साहित्यिकांनी आपली ग्रंथसंपदा पाठवावी, तसेच या साहित्यिकांचे यथोचित स्वागत संमेलनामध्ये करण्यात येणार असल्याने साहित्यिकांनी या उपक्रमासाठी भरघोस प्रतिसाद द्यावा असेही त्यांनी सांगितले. या संदर्भातील अधिक माहितीसाठी ग्रंथ प्रदर्शन संयोजक तथा मसाप फलटण शाखा कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे (98607 54457), मसाप फलटण शाखा कार्यवाह अमर शेंडे (99227 78386) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही रवींद्र बेडकिहाळ यांनी केले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!