फलटण,माण व खटाव तालुक्यात ३९ टँकरने पाणीपुरवठा

फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा, दि.२८ सप्टेंबर २०२६) :- सातारा जिल्ह्यातील माण, खटाव आणि फलटण या तीन तालुक्यांतील ४२ गावे आणि २७५ वाड्यांमधील एकूण ६३ हजार ९९० लोकसंख्या टंचाईने बाधित झाली आहे. तसेच ५३ हजार ८०७ पशुधनही या टंचाईमुळे बाधित झाले आहे.  या बाधित गावांना व वाड्यांना ३९ टँकद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.
या परिस्थितीवर मात करण्यासाठी सध्या एकूण ३९ टँकर प्रत्यक्ष सुरू करण्यात आले असून यामध्ये १ शासकीय आणि ३८ खाजगी टँकरचा समावेश आहे. यात सर्वाधिक टंचाईची तीव्र ताण माण तालुक्यात दिसून येत आहे. माण तालुक्यातील ३५ गावे आणि २३९ वाड्यांतील ५६ हजार १५७ लोकसंख्येसाठी ३५ टँकर सुरू आहेत.   
खटाव तालुक्यात ७ गावे आणि ३६ वाड्यांतील ७,८३३ लोकसंख्येला ४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.   फलटण तालुक्यात ३ गावे आणि ४ वाड्यांतील २ हजार २२२ लोकसंख्या बाधित असून तेथे ३ टँकर मंजूर करण्यात आले आहेत. 
संपूर्ण जिल्ह्यात ८५.६० फेऱ्या मंजूर करण्यात आल्या होत्या, त्यापैकी दररोज ८१ फेऱ्या (९४.६३ टक्के) पूर्ण करून टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!