
फलटण टुडे वृत्तसेवा (आसू,दि. 19 मे २०२६ ):-
जानेवारी २०२६ मध्ये” इस्कॉन” च्या फलटण विभागाच्या वतीने आयोजित भगवद्गीतेवर आधारित स्पर्धा परीक्षेमध्ये चि. श्रेयश यांनी वरिष्ठ गटात प्रथम क्रमांक मिळविला असुन तो जय भवानी हायस्कुल तिरकवाडी ता. फलटण या संस्थेचा इ.९ वी चा विद्यार्थी आहे.
राष्ट्रीय स्तरावरील प्रथम ५० विद्यार्थ्यांची बेंगलोर येथील नामांकित ISRO (इस्रो) संस्थेला भेट आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये त्याची निवड झाली आहे. सदर भेट दौरा १२ जून २०२६ रोजी नियोजित असुन विद्यार्थ्यांबरोबर पालकांची ही उपस्थिती असणे आवश्यक असल्याचे इस्कॉन फलटण विभागाचे श्री. अतुल दास यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील तसेच शेतकरी कुटुंबातील विद्यार्थीही बुद्धिमत्तेच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवरती चमकु शकतात हे यानिमित्ताने चि. श्रेयश याने सिद्ध करुन दाखविले आहे.
या निवडीबद्दल कु. श्रेयश डांगे याचे पालकांचे, गुरुजनांचे परिसरातुन कौतुक होत आहे. विशेषतः जि.प.चे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जि.प.सदस्य श्री. सह्याद्रीभैय्या कदम, पं. स. फलटणचे उपसभापती श्री. अमोलदादा सस्ते, पं.स.सदस्या सौ. विजयाताई सोनवलकर-पाटील, बाजार समिती संचालक श्री. मोहनराव डांगे, प्राध्यापक राजेंद्रकुमार डांगे, जय भवानी एज्युकेशन सोसायटी तिरकवाडी चे अध्यक्ष श्री. आनंदराव शितोळे, सचिव श्री. राजेंद्र दादा शितोळे, संचालक श्री. गुलाबराव डांगे, प्राचार्य श्री. संजय नाळे सर संस्थेचे सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह ग्रामपंचायत भाडळी बु., मातोश्री वि.का.स सेवा सोसायटी चे आजी माजी पदाधिकारी, शिक्षणप्रेमी यांनी अभिनंदन केले.

