फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती, दि ९ मे २०२६):-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जाहीर झालेल्या इयत्ता १०वीच्या परीक्षेच्या निकालात ज्ञानसागर गुरुकुल विद्यालयाने यंदाही उज्ज्वल यश संपादन करत १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे.यामध्ये प्रवीण महेश दराडे (93.20%) व राजवीर उमेश रणवरे (93.20%) या दोघानीं समान गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकवीला, स्वरा नितीन टकले हिने 92.60% गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकवीला तसेच अदिती म्हाकू अनुसे हिने 90.20% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकवीला यानंतर माहेश्वरी भोयर (90.00%), ओम गावडे (89.80%), ईश्वरी खटावकर (88.80%), तन्वी लकडे (87.40%), करण काळे (86.60%), तनिष्का शिंदे(86.60%), श्रेया झगडे (86.00%),सुजल जाधव (85.80%), शरवरी खटके(84.20%), आरोही भाळे (83.40%), वैष्णवी शिंदे (83.40%), श्रेयश झगडे(83.20%), सार्थक माने (81.80%) वरील एकूण 17 विद्यार्थ्यांनी 80.00% पेक्षा जास्त गुण मिळवल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन..


तसेच विद्यालयातील इतर सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवत यश संपादन केले असून, पालक व शिक्षकांच्या मेहनतीला यशाची सुवर्णकिनार लाभली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सागर आटोळे सर, उपाध्यक्षा रेश्मा गावडे मॅम, सचिव मानसिंग आटोळे सर, विश्वस्त पल्लवी सांगळे, विश्वस्त आरती आटोळे,दिपक सांगळे,दिपक बिबे, सी. ई. ओ. संपत जायपत्रे , विभाग प्रमुख गोरख वणवे , मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे,सुधीर सोनवणे, नीलिमा देवकाते, राधा नाळे, नीलम जगताप तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले आहे.
विद्यालयामध्ये शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला जातो. नियमित सराव, मार्गदर्शन, टेस्ट सिरीज आणि शिक्षकांचे वैयक्तिक लक्ष यामुळे विद्यार्थ्यांना हे यश मिळाल्याचे मत पालकांनी व्यक्त केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरातून विद्यालयावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, ज्ञानसागर गुरुकुलने शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.



