फलटण टुडे वृत्तसेवा (डॉ. मोहन पवार आरोग्यविषयी जनजागृती पर लेख )
आजच्या काळामध्ये सर्वात मोठा निर्माण झालेला प्रश्न म्हणजे ताण तणाव आज अनेकांच्या वैयक्तिक आयुष्यात आणि करिअर यामधील समतोल साधता साधता तारांबळ उडते यामुळे ” वर्क लाइफ ट्रेस ” ला सामोरे जावे लागते ही समस्या फक्त मानसिक थकवाच निर्माण करत नाही तर शारीरिक आजारांनाही आमंत्रण देते. जसे की तणाव जास्त दिवस राहिल्यामुळे कॉर्टिसोल सारख्या हार्मोन्सची पातळी वाढते व त्यामुळे त्याचा परिणाम होऊन हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह टाईप टू, छातीत दुखणे, चिंता, नैरास्य ,ऍसिडिटी ,स्नायूंचे आजार आणि विशेष म्हणजे स्मरणशक्ती कमी होते. तणाव दोन प्रकारचे असतात तीव्र तणाव हा थोड्याच काळापुरता असतो आणि त्याचे कारण नाहीसे झाल्यावर नाहीसा होतो दुसरा म्हणजे जास्त काळ असणारा तणाव निर्माण झाल्यानंतर तो काही आठवडे किंवा महिनाभर चालू राहतो. त्याचे परिणाम संपूर्ण शरीरावर दिसून येतात म्हणूनच ताण-तणावाचे व्यवस्थापन केले पाहिजे यामध्ये कामाशी संबंधित व वैयक्तिक जीवनातील तणाव यातील फरक समजून घेतला पाहिजे. वेळेचे दडपण भूमिकेची स्पष्टता नसणे यांसारख्या समस्यांना तोंड देता आले पाहिजे नाही म्हणता येत नसल्याने आपल्या मनावरील ताण नकोसा होतो म्हणून योग्य ठिकाणी नाही म्हणता येणे हे खूप महत्त्वाचं जीवन कौशल्य आत्मसात करायला शिकले पाहिजेल ताण ताणव्याचे सगळ्यात धोक्याचे वय म्हणजे चाळीशी ते पन्नाशी यामध्ये मुलांच्या शिक्षणाचे टेन्शन तसेच करिअर निम्म्यातच आल्यामुळे वाढलेला ताण . तणावामुळे निर्माण झालेली मानसिक व स्थिती शारीरिक थकवा दूर करण्यासाठी जेव्हा मन अस्वस्थ असेल तेव्हा डोळे मिटून हळूहळू खोल श्वास घ्या आणि हळूहळू सोडा यामुळे ताण कमी होतो दिवसातून दहा मिनिटे शांत जागी बसून स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा विचारांचे नियंत्रण न करता फक्त त्याचे निरीक्षण करा नियमित व्यायाम करा चालणे योगासने करा ज्यामुळे मन ताजेतवाने राहील झोपण्यापूर्वी किमान एक तास मोबाईल टीव्ही यांच्यापासून लांब रहा यामुळे मेंदूला विश्रांती मिळते आपल्याला आवडणारा छंद जोपासा जसे संगीत ऐकणे वाचन करणे घरातील कामे करणे यामुळे मन विचलित होते आणि आनंद मिळतो आणि सर्वात महत्त्वाचे झोप पूर्ण झाली पाहिजे यामुळे आपल्याला दुसऱ्या दिवसाची सुरुवात सक्रिय होते झोप न झाल्यास तणावाचे व्यवस्थापन करणे अधिक कठीण होत जाते तणाव दूर करण्यासाठी एक कानमंत्र प्रत्येक गोष्ट मनासारखी करण्याचा प्रयत्न जे बदलू शकत नाही ते स्वीकारणे आणि वर्तमानात जगणे हीच खरी ताण-तणाव कमी करण्याचा मंत्र आहे….

“ताण तणावाचं करा व्यवस्थापन”

आपलाच
डॉ.मोहन पवार
शारीरिक चिकित्सक