जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत कु. गौरी टिळेकरचे घवघवीत यश; विभागीय स्पर्धेसाठी निवड

कु. गौरी टिळेकर चा सत्कार करताना..उप प्राचार्या सौ. पूनम कदम

फलटण टुडे वृत्तसेवा ( सातारा दि २४ सप्टेंबर २०२६):-
सातारा येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, फलटणची विद्यार्थिनी कु. गौरी टिळेकर हिने चमकदार कामगिरी करत ६० ते ६४ किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

Screenshot


गौरीने आपल्या उत्कृष्ट क्रीडाकौशल्याच्या जोरावर हे यश संपादन केले असून, तिची विभागीय स्तरावरील बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या या यशामुळे मालोजीराजे शेती विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.


या उल्लेखनीय यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, प्राचार्य बाळकृष्ण काळे, उपप्राचार्य सौ. पूनम कदम, उपमुख्याध्यापक राजेंद्र माडकर, पर्यवेक्षक सी. टी. कर्वे यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गौरीचे व तिला मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक उत्तम घोरपडे यांचे अभिनंदन केले आहे, तसेच आगामी विभागीय स्पर्धेसाठी तिला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!