मा. मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मालोजीराजे शेती विद्यालय व जुनिअर कॉलेज मध्ये महाराष्ट्र कृषी दिन साजरा.

विद्यालयात मा. मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती व महाराष्ट्र कृषी दिन साजरा करताना मा प्राचार्य श्री बी.डी काळे व उपप्राचार्य पूनम कदम , विद्यार्थी व इतर मान्यवर

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि १ जुलै २०२६):- १ जुलै महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. 1 जुलैपासून सुरू होणारा हा आठवडा आणि 7 जुलैला संपणार आहे. बऱ्याच ठिकाणी हा आठवडा कृषी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य आहे. राज्याची आर्थिक व्यवस्था मुख्यतः कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. शेती करणाऱ्या शेतकऱ्यांमुळेच आपल्याला अन्न मिळते. त्यामुळे महाराष्ट्रात कृषी दिनाचे खूप महत्व आहे. या दिनाचे औचित्य साधून इयत्ता १२ वी मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ व कौतुक करत विद्यालय जुन्नर कॉलेज मध्ये कृषी दिन संपन्न झाला.


कार्यक्रमाची सुरुवात मा.मु कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालाचे प्राचार्य श्री बी.डी काळे व उपप्राचार्य पूनम कदम व उपस्थित मान्यवरचे हस्ते संपन्न झाला, तसेच हरितक्रांतीचे कै. वसंतराव नाईक यांच्या जीवनाचा संदर्भाची माहिती प्रा. प्रसाद सातपुते यांनी उपस्थितांना दिली. तदनंतर इयत्ता १२ वी मध्ये प्रथम क्रमांका आलेले विद्यार्थी विद्यार्थिनी व कृषी विज्ञान, कृषी विज्ञान व तंत्रज्ञान,फलोद्यान व प्राणीशास्त्र या २०० मार्कच्या विषयांमध्ये पैकीच्या पैकी गुण(२००/२००) मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कृषी दिनानिमित्त संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रस्तावना श्री मारुती दिवसे यांनी केली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सूत्रसंचालन व आभार सौ. मोरे यांनी केले.

Screenshot
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!