मयुरेश मारुती साळवे ९३.२०% मिळवत प्रथम क्रमांक
निकालात मुलींची बाजी
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण , दि ८ मे २०२६):-
फलटण एज्युकेशन सोसायटी च्या श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय नांदल च्या शैक्षणिक वर्ष २०२५/२६ च्या इयत्ता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा, पुणे मार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10 वी एस एस एस सी बोर्ड च्या परीक्षेत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून उज्जवल यशाची सलग आठ वर्षाची परंपरा कायम राखत विद्यालयाने बाजी मारली आहे.

एस एस सी बोर्ड परीक्षेसाठी एकूण ५८ विद्यार्थी बसले होते यामध्ये ५८ पैकी ५८ विद्यार्थी उत्तीर्ण होते १०० % निकालाची नोंद नांदल केंद्रात झाली आहे. प्रशालेतील ५८ विद्यार्थ्यांपैकी १८ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी मिळाली, प्रथम श्रेणी २० विद्यार्थ्यांना मिळाली तर १७ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी मिळाली आहे.
प्रशालेतील खालील विद्यार्थ्यानी उज्ज्वल यश संपादन करत प्रथम तीन क्रमांक मिळविले आहेत
प्रथम क्रमांक-
चि.मयुरेश मारुती साळवे ९३.२०%
द्वितीय क्रमांक –
कु. श्रावणी सुनील कोळेकर ९२.४०%
तृतीय क्रमांक-
कु. सलोनी सतीश जगताप ८९.४०%
गुण मिळवत प्रशालेत प्रथम तीन क्रमाकात येण्याचा बहुमान मिळवला आहे
वरील सर्व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे व त्याना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा विधान परिषदेचे विद्यमान आमदार मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार मा.श्री दीपकराव चव्हाण ,फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर,सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन तथा फलटण पंचायत समिती चे माजी सभापती मा श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, फलटण एजुकेशन सोसायटी चे प्रशासन अधिकारी मा. अरविंद निकम, तपासणी अधिकारी मा.दिलीप राजगुडा , सहायक तपासणी अधिकारी मा.सुधीर अहिवळे, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. शिवाजी काळे , शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री शिवाजी मारुती कोळेकर, श्री. पांडुरंग बाबुराव कोळेकर, श्री. आप्पा जगन्नाथ गुळदगड , फलटण एजुकेशन सोसायटी नियामक मंडळ सदस्य व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


