एसटी कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद : नगराध्यक्ष सचिन सातव

बारामती आगार येथील रक्तदान शिबिर प्रसंगी नगराध्यक्ष सचिन सातव,व एसटी कर्मचारी

एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

फलटण टुडे वृत्तसेवा ( बारामती दि १७ ऑगस्ट २०२६):-
एसटी कर्मचारी नेहमी वेतन व विविध विषयांवर शासना सोबत संघर्ष करतात तरीही अहोरात्र प्रवाश्यांना उत्कृष्ट सेवा देतात व सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान शिबिर आयोजित करण्यासारखे उपक्रम राबवितात म्हणून एसटी कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन बाराम तीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांनी केले.
एसटी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे बारामती आगार, एमआयडीसी विभागीय कार्यशाळा, व एमआयडीसी आगार यांच्या वतीने १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी नगराध्यक्ष सचिन सातव यांनी मार्गदर्शन केले.

Screenshot


या प्रसंगी आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल, नगरसेवक अल्ताफ सय्यद, निलेश इंगुले, गणेश जोजारे,सोमनाथ गजाकस,गोरख पारसे पोलीस उपनिरीक्षक बबन जाधव, दादा सोळसकर, चव्हाण पाटील,माजी विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड ,सोलापूर विभाग नियंत्रक अमोल गोंजारी , सहारा फौंडेशन अध्यक्ष परवेज सय्यद आदी उपस्तीत होते.

एसटी कर्मचारी, विविध एसटी कर्मचारी संघटना व प्रवासी यांनी रक्तदान शिबिर मध्ये सहभागी होऊन अजित दादा यांना आदरांजली व स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याचे आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल यांनी सांगितले.

शाहिद सय्यद ,मनोज गालींदे, सोनबा वाडकर ,दादासो साळवे, निखिल शेंडे, संजय काशीद ,गणेश कासार, सचिन लोणकर, विकास सावंत, लतीफ अत्तार,नाथबाबा नलावडे, बंडा शेलार, तानाजी शिंदे, विशाल सावंत, अमर पठाण व विकास काळे आदी नी सदर शिबीर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले

Screenshot

दररोज प्रवास करणारे विद्यार्थी, नोकरदार, महिला व व्यापारी यांनी सदर शिबारामध्ये रक्तदान करून शुभेच्छा दिल्या


Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!